वसुधा का कल्याण न भूलें…

29 Jul 2019

  ‘वाघ’ हा खरं तर आपल्या मनाच्या खूप जवळचा प्राणी. अगदी लहानपणापासून इसापनीती, पंचतंत्र अशा गोष्टींमधून आपण वाघाच्या गोष्टी ऐकल्या आहेत. पण लहानपणी आपल्या काल्पनिक विश्वाचा हा ‘राजा’ आपण मोठं झाल्यावर मात्र मनापासून लांब जायला लागला. पूर्वी निसर्गपर्यटनाची व्याप्तीही सुट्टीच्या दिवशी स्वतःची गाडी घेऊन जंगलात जायचं, एखाद्या नदीकाठच्या किंवा तलावाकाठच्या जागी जाऊन मजा करायची आणि […]

Continue Reading

निसर्गाय नमः॥

29 Nov 2018

पहाटेची वेळ होती. अंधुक अंधुक दिसू लागलं होतं. शर्वरीचा अंधार भेदत उगवत्या सूर्याचे किरण गगनपटलावर सुरेख नक्षी मांडत होते. नागझिरा अभयारण्यातील ती सुरेख सकाळ मला वेगळीच भुरळ घालत होती. ‘मधुकुंज’च्या व्हरांड्यातून समोर दिसणारं विस्तीर्ण तळं ह्या सौंदर्यात अधिकच भर घालत होतं. तळ्यातल्या पाण्यावर निर्माण होणाऱ्या हळुवार लाटा मोहक दिसत होत्या. दिवसभराच्या उमेदवारीसाठी तयार होणाऱ्या पक्ष्यांचा […]

Continue Reading

निसर्ग त्यांना कळला हो

07 Nov 2018

सिक्कीम… भारताच्या ईशान्य सीमेवर असलेलं राज्य. भारतातील पहिले ‘सेंद्रिय’ राज्य. तसं ह्या राज्याला आपल्या भौगोलिक रचनेमुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या तीन दिशांना चीन आणि भूतान हे देश पसरलेले. चीनच्या शेजारामुळे बऱ्याचदा चर्चेत राहिलेलं असं हे राज्यं. पण खरं सांगायचं तर निसर्गदेवतेने आपल्या रंगांची इथे मुक्तहस्ते उधळण केली आहे. सिक्कीम राज्याचे राज्यपाल मा. श्रीनिवासजी पाटील ह्यांनी सुचवल्यामुळे माझा […]

Continue Reading